नवी मुंबई, 14 एप्रिल 2017/AV News Bureau:
रेल्वे मार्गाच्या दुरूस्तीचे काम करण्यासाठी 15 आणि 16 एप्रिल रोजी मध्य रेल्वेच्या ट्रान्सहार्बर मार्गावरील ठाणे-वाशी,नेरूळ, पनवेलदरम्यान दोन्ही मार्गावर धावणाऱ्या गाड्या बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे गाड्यांच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे. दुपारी 12.35 ते दुपारी 2.5 या काळात दोन्ही दिवस हा ट्रॅफिक ब्लॉक करण्यात आला आहे.
डाउन सेवा
- ठाण्याहून वाशीला सुटणाऱ्या पुढील गाड्या रद्द – दुपारी 12.12 ची गाडी, 12.40 ची गाडी, 1.1 ची गाडी, 1.25 ची गाडी आणि 1.57 ची गाडी.
- ठाण्याहून नेरूळसाठी सुटणाऱ्या पुढील गाड्या रद्द – दुपारी 12.20 ची गाडी, दुपारी 1.10 ची गाडी, दुपारी 1.37 ची गाडी.
- ठाण्याहून पनवेलसाठी सुटणाऱ्या पुढील गाड्या रद्द – दुपारी 12.52 ची गाडी, दुपारी 1.18 ची गाडी, दुपारी 2.5 ची गाडी.
अप सेवा
- वाशीहून ठाण्यासाठी जाणाऱ्या पुढील गाड्या रद्द –दुपारी 12.21 ची गाडी, 12.49 ची गाडी, दुपारी 1.18 ची गाडी, दुपारी1.40 ची गाडी.
- नेरूळहून ठाण्यासाठी जाणाऱ्या पुढील गाड्या रद्द –दुपारी 12.10 ची गाडी, 12.31 ची गाडी, दुपारी 1.00 ची गाडी, दुपारी1.50 ची गाडी.
- पनवेलहून ठाण्यासाठी जाणाऱ्या पुढील गाड्या रद्द –दुपारी 12.18 ची गाडी, 1.4 ची गाडी
ट्रान्सहार्बरवरील ट्रॅफिक ब्लॉकमुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना हार्बर आणि मेन लाइनवरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.