ठाणे, 14 एप्रिल 2017 /AV News Bureau:
ढोल ताशांच्या गजरात आज ठाणे महानगरपालिकेच्यावतीने भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 126 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. आज सकाळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री, तथा ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री ना.एकनाथ शिंदे, महापौर सौ. मिनाक्षी राजेंद्र शिंदे, उपमहापौर रमाकांत मढवी, सभागृह नेते नरेश म्हस्के, विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, अतिरिक्त आयुक्त (1) सुनील चव्हाण, यांनी महामानवास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून महापौर मिनाक्षी राजेंद्र शिंदे यांनी यावर्षीपासून अनु. जाती-जमाती संवर्गातील विशेष प्राविण्यासह 10 वीची परीक्षा उत्तीर्ण होणा-या पहिल्या 20 विद्यार्थींनींसाठी 5 हजार रूपयांची शिष्यवृत्ती सुरू करण्याची घोषणा केली.
कोर्ट नाका येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर येथून सर्वपक्षीय मिरवणुकीस प्रारंभ झाला. वाजत गाजत सदर मिरवणूक स्टेशन येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ विसर्जित झाली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ता काढलेल्या मिरवणुकीची छायाचित्रे.