पाच लाख पाच हजार रुपयांचा मूद्देमाल जप्त
बोर्ली –मांडला, 11 एप्रिल 2017/AV News Bureau:
दारूबंदी विरोधी पथकाने रोहा तालुक्यातील चणेरा विभागात असणाऱ्या गावठी दारूच्या अड्ड्यांंवर धाड टाकून सुमारे पाच लाख रुपये किमतीचे दारू बनविण्याचे रसायन आणि साहित्य जप्त करण्यात आले आहे.
रोहा पोलीस ठाणे हद्दीतील न्हावा, कोपरी, धोन्ड्खार, करंजविरा आदी भागात बेकायदेशीर गावठी दारू बनविण्याचे अड्डे सुरू असल्याची माहिती या पथकाला मिळाली होती.रोहा उपविभागिय पोलीस अधिकारी दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली धाड टाकण्यात आली. या धाडीत गावठी दारू बनविण्याचे नवसागर मिश्रित रसायने भरलेले 37 प्लास्टिक टाक्या आणि इतर साहित्य असा सुमारे 5 लाख पाच हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त करून त्याची विल्हेवाट लावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
राष्ट्रीय महामार्गावरील अपघात हे वाहन चालक मद्यपान करीत असल्यामुळे घडल्याचे अनेकदा आढळून आले आहे. याची गंभीर दखल घेत उच्च न्यायालयाने हायवे लगतची सर्व मद्याची दुकाने, बार यांचे परवाने ३१ मार्च २०१६ पर्यंत रद्द करण्याचे आदेश दिले होते. त्याची१ एप्रिलपासून कडक अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे.