मुंबई, 11 एप्रिल 2017 /AV News Bureau:
महावितरणच्या ग्राहकांना नवीन वीजजोडणी सुलभतेने मिळावी तसेच याबाबत तक्रारी असल्यास त्या तातडीने सोडविण्यासाठी तसेच ग्राहक नावात बदल करण्यासाठी महावितरणच्या मुंबई येथील प्रकाशगड मुख्यालयात ‘विशेष मदत कक्ष'(mseb’s special help centre) सुरू करण्यात आला आहे.
महावितरणच्या नवीन ग्राहकांना वीजजोडणी घेताना आणि आपल्या नावात बदल करताना विविध कारणांमुळे अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे पैसे भरून नवीन वीजजोडणी न मिळालेल्या ग्राहकांच्या तक्रारींची दखल घेऊन अशा ग्राहकांना त्वरीत वीजजोडणी मिळावी, यासाठी या (mseb’s special help centre)’विशेष मदत कक्षा’द्वारे मदत करण्यात येईल.
नवीन वीजजोडणी, नावात बदल व वीजजोडणी न मिळालेल्या ग्राहकांनी आपली तक्रार सोडविण्यासाठी (mseb’s special help centre)022-26478989 व 022-26478899 या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.