क्रांतीसिंह नाना पाटील उद्यानाची दुरवस्था

मनसेने पालिका प्रशासनाचे लक्ष वेधले

नवी मुंबई, 11 एप्रिल 2017/AV News Bureau:

सीवूड्स सेक्टर-४६ येथील क्रांतिसिंह नाना पाटील उद्यानाची (nana patil garden) दुरवस्था झाली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय होत असून महापालिका प्रशासनाने तातडीने लक्ष घालून उद्यानातील अडचणी दूर कराव्यात,अशी मागणी मनसेच्या सीवूड्स विभागाने पालिका प्रशासनाकडे केली आहे.

nana patil garden

सीवूड्स येथील सेक्टर 46 मध्ये असलेल्या क्रांतिसिंह नाना पाटील उद्यानाची (nana patil garden)अतिशय दुरवस्था झाली आहे. या उद्यानाचे प्रवेश द्वार पूर्णपणे मोडकळीस आले आहे. उद्यानातील आसन व्यवस्था पार तुटून गेली असल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी योग्य बेंचेस नसल्यामुळे त्यांची मोठी गैरसोय होत आहे. उद्यानातील लहान मुलांचे प्रमुख आकर्षण असणारी झोपाळा, घसरगुंडी व इतर खेळणी तुटलेल्या अवस्थेत आहेत. आता शाळांना सुट्टी लागल्या असून उद्यानात खेळण्यासाठी येणाऱ्या मुलांना या तुटलेल्या खेळण्यांमुळे गंभीर दुखापती होण्याची भिती अधिक आहे. याप्रकरणी सीवूड्स मनसे विभागाने पालिकेचे उद्यान अधिकारी तुषार पवार यांची भेट घेऊन उद्यानातील दुरवस्थेबाबतची माहिती कानावर घातली आणि उद्यानाला भेट देवून  प्रत्यक्ष पाहणी करण्याची विनंती केली. यावर येत्या १५ दिवसांत उद्यानाच्या सर्व समस्या सोडवू असे आश्वासन  उद्यान अधिकारी तुषार पवार यांनी मनसेच्या शिष्टमंडळाला दिले.garden seat

यावेळी मनसे सीवूड्स पश्चिम विभागाचे उपविभाग अध्यक्ष अमोल (भाऊ) आयवळे, विभाग अध्यक्ष सचिन कदम, उपविभागअध्यक्ष भरत पासलकर, शाखा अध्यक्ष आप्पासाहेब जाधव, अरविंद मोरे, वैभव कांबळे, राजू खाडे, प्रद्युम्न हेगडे, रोजगार विभागाचे अप्पासाहेब कोठुळे आणि अन्य मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.