रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले
लखनऊ, 10 एप्रिल 2017 :
उत्तर प्रदेशात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत बहुजन समाज पक्षाचा दारुण पराभव झाला असून गेल्या 10 वर्षांत बसपाचा आलेख खालावत चालला आहे. त्यामुळे आगामी काळात बसपाला पर्याय म्हणून रिपब्लिकन पक्ष पुढे येईल, असा प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. लखनऊ येथील भागिरथी भवन मध्ये झालेल्या रिपाइंच्या कार्यकर्ता संमेलनात ते बोलत होते.
उत्तर प्रदेशात गावागावात रिपब्लिकन पक्षाची शाखा स्थापन करून दलित मुस्लिमांची एकजुट उभारा असे आवाहन आठवले यांनी केले.
दरम्यान, उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांची रामदास आठवले यांनी सदिच्छा भेट घेतली आणि विवीध विषयांवर चर्चा केली.