नवी मुंबई,6 एप्रिल 2017/AV News Bureau:
उन्हाळी सुट्टीनिमित्त कोकण, गोवा तसेच दक्षिणेकडील राज्यांमध्ये जावू इच्छिणाऱ्या प्रवाशांसाठी खूश खबर आहे. मध्य रेल्वेने उन्हाळी सुट्टीनिमित्त कोकण रेल्वेमार्गावर सीएसटी ते एर्नाकुलमदरम्यान 16 साप्ताहिक विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांना कोकणातील काही रेल्वे स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.
- गाडी क्रमांक 01065 साप्ताहिक विशेष गाडी 18 एप्रिल ते 6 जून या काळात दर मंगळवारी दुपारी 3.35 ला सीएसटी स्थानकातून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी एर्नाकुलम स्थानकात पोहोचेल.(आठ फेऱ्या)
- गाडी क्रमांक 01066 साप्ताहिक विशेष गाडी 19 एप्रिल ते 7 जून या काळात दर बुधवारी रात्री 11 वाजता एर्नाकुलम स्थानकातून सुटेल आणि रविवारी मध्यरात्री 12.40 ला सीएसटी स्थानकात पोहोचेल. (आठ फेऱ्या)
- गाडीचे थांबे
या साप्ताहिक विशेष गाड्यांना दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, थिविम, मडगाव, कारवार, कुमठा, भतकळ, मुकांबिका रोड,बायंदूर, कुंदापुरा, उडुपि, मुल्कि, सुरतकल, मंगलोर जंक्शन, कासारगड, कन्नुर, कोझिकोड, शोरानुर जंक्शन आणि त्रिसुर या स्थानकांवर थांबविण्यात येणार आहे.
- डब्यांची रचना
या विशेष गाड्यांना 5 एसी थ्री टायर, 8 स्लीपर क्लासचे डबे जोडण्यात येणार आहेत.
- रिझर्व्हेशन
गाडी क्रमांक 01065 गाडीचे रिझर्व्हेशन विशेष शुल्कासह 10 एप्रिलपासून सुरू होणार आहे.