10 एप्रिलला कोकण विभागीय लोकशाही दिन

नवी मुंबई, 3एप्रिल 2017/AV News Bureau:

कोकण विभागीय स्तरावरील लोकशाही दिन  10 एप्रिल  रोजी सकाळी 10 वाजता विभागीय बेलापूर येथील कोकण भवन येथे आयोजित करण्यात आला आहे. या लोकशाही दिनी विभागीय आयुक्त व विभागीय स्तरावरील अधिकारी सकाळी 10 ते दुपारी 1पर्यंत नागरिकांच्या तक्रारी, गाऱ्हाणी, अडचणींबाबत अर्ज / निवेदने स्विकारणार आहेत.

निवेदन स्विकारण्यासाठी निकष

शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडील शासन परिपत्रक क्र.प्रसुधा 2011/प्र.क्र.189/11/18-अ दि.26 सप्टेंबर 2012 मधील नमुद तरतुदींनुसार लोकशाही दिनाच्या बैठकीत ज्या अर्जदारांनी 15 दिवस अगोदर या कार्यालयाकडे विहित नमुन्यामध्ये अर्ज सादर केलेला असेल अशाच अर्जदारांचे गा-हाणे ऐकण्यात येईल. विहित मुदतीमध्ये सादर न केलेले अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही याची कृपया नोंद घ्यावी, असे विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांनी कळविले आहे.