मुंबई, 29 मार्च 2017/AV News Bureau:
मुंबई महानगरपालिकेचा 2017-18 चा 25 हजार 141, 51 कोटी रूपयांचा अर्थसंकल्प आज मनपा आयुक्त अजोय मेहतांनी सादर यांनी सादर केला. पारदर्शक कारभार, जबाबदारी, काटकसर, विकास आराखड्याशी संलग्नता, आर्थिक स्त्रोतांचा सुयोग्य वापर या पाच मुख्य मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे अर्थसंकल्प तयार करण्यात आल्याचे मेहता यांनी सांगितले.
या अर्थसंकल्पात कोस्टल रोडसाठी 1 हजार कोटींची तर गोरेगाव-मुलुंड लिंक रोडसाठी 130 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेचा 2017-18 चा शिक्षण समिती अर्थसंकल्प सादर करण्यात आला. शिक्षण समिती अध्यक्षा शुभदा गुढेकर यांना अतिरीक्त आयुक्त आय ए कुंदन यांनी शिक्षण समिती अर्थसंकल्प सादर केला. शिक्षण समितीसाठी यंदा 2311.66 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदाच्या शिक्षण समिती अर्थसंकल्पात 83 कोटींची घट झाली आहे.
डिजीटल स्कूल अंतर्गत 1200 महापालिकेच्या शाळा डिजीटल होणार आहेत. यासाठी बजेट मध्ये दीड कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
३८.६२ लाखमहापालिका शाळांना आंतरराष्ट्रीय शाळांचा दर्जा मिळवून देण्यासाठी खास योजना असणार आहे. विद्यार्थ्यांची बुद्धीमत्ता तपासण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिक्षांचे आयोजनमहापालिकेच्या २६ शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बनवणार असल्याचे या अर्थसंकल्पात नमूद करण्यात आले आहे.