नगरविकास राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांची विधानपरिषदेत माहिती
मुंबई, 29 मार्च 2017/AV News Bureau:
मुंबई उपनगरात सुरु असलेल्या मोनो रेल सेवेची भाडेवाढ प्रस्तावित नसल्याचे नगरविकास राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी आज विधानपरिषदेत सांगितले.
मुंबईतील मोनो रेल्वे सेवेची भाडेवाढ रद्द करण्यासंदर्भातील प्रश्न आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित करण्यात आला होता. विधानपरिषद सदस्य आर्किटेक्ट अनंत गाडगीळ यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना डॉ. पाटील यावेळी म्हणाले की, रेल्वे आणि मेट्रो रेल्वे याबरोबरच मुंबईकरांना प्रवासासाठी मोनो रेल सुरु करण्यात आली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्यामार्फत सध्या मोनो रेलच्या सिक्युरिटीसाठी 20 ते 25 टक्के खर्च करण्यात येत आहे. मात्र मोनो रेलचे भाडे वाढविले जाणार नसून तसे प्रस्तावितही नाही.