खांदावासीय भाजपच्या उमेदवारांना निवडणार

भाजप नेते रामशेठ ठाकूर

पनवेल,29 मार्च 2017 /AV News Bureau:

खांदा कॉलनी विभाग हा भाजपचा बालेकिल्ला आहे. विरोधी पक्षातील अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये येऊन पदाधिकारी झालेले आहेत. त्यामुळे खांदा कॉलनीतील रहिवासी भाजपच्या सर्व उमेदवारांना निवडून देतील असा विश्वास लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केला आहे.

शासकीय अधिकारी बदली होत असतात मात्र शहराच्या विकासाला हक्काच्या नगरसेवकाला जबाबदार धरू शकतो असेही ते यावेळी म्हणाले.

खांदा कॉलनी भाजप जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन ठाकूर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाप्रवके वाय टी देशमुख,युवा नेते परेश ठाकूर, माजी  नगरसेवक अनिल भगत,  गणेश पाटील, मनोहर म्हात्रे,एकनाथदादा गायकवाड,माजी नगरसेविका सीताताई पाटील,अलका भगत, मंगला राणे, भीमराव पोवार, संजय भोपी, गणपत पाटील,गणेश पवार,मोतीराम कोळी, शांताराम महाडिक,जितेंद्र माने,सचिन मोरे,अवदेश शुक्ला,चेतन जाधव,चिन्मय समेळ यांच्यासह शेकडो  कार्यकर्ते उपस्थित होते.

या कार्यक्रमामध्ये शेकाप कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. त्यांचे स्वागत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या परिसरातील नवनियुक्त विशेष कार्यकारी अधिकारी रामनाथ पाटील,संजय कांबळे,अंकुश खरमाटे,विजय कोल्हेकर,वासुदेव गुरव,विजय निगडे यांचा यावेळी जाहीर सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर खांदा कॉलनी भाजप मागासवर्गीय कमिटीच्या अध्यक्षपदी प्रशांत साळवी,उपाध्यक्षपदी सुनील हरनामे तर सरचिटणीसपदी सुदीप वाटवे यांची नियुक्ती जाहीर करून त्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.