नवी मुंबई, 29 मार्च 2017 /AV News Bureau:
नवी मुंबई महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांचा आज सर्वसाधारण सभेत महापौर सुधाकर सोनवणे यांच्या शुभहस्ते पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. यावेळी उपमहापौर अविनाश लाड, स्थायी समिती सभापती,सभागृह नेते, विरोधी पक्षनेते तसेच नगरसेवक उपस्थित होते.
आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी सत्काराबद्दल आभार व्यक्त करीत प्रगतीशील दृष्टिकोन ठेवून नियमानुसार योग्य ती विकास कामे करण्यावर भर दिला जाईल असे सांगितले.