नवी मुंबई महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त डॉ. रामास्वामी एन.
नवी मुंबई, 27 मार्च 2017 /AV News Bureau:
माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सुरू केलेली कामे पुढे सुरूच ठेवणार आहोत. मात्र मात्र ही कामे करताना लोकांना विश्वासात घेतले जाईल, असे नवी मुंबई महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी आज सांगितले. रामास्वामी येत्या 30 मार्च रोजी नवी मुंबई महापालिकेत काम सुरू करणार आहेत.
बेकायदेशीर बांधकामाबाबतच्या राज्य सरकारच्या प्रस्तावित धोरणालाच थेट विरोध केल्यामुळे तुकाराम मुंढे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यांच्याजागी नियुक्त झालेल्या रामास्वामी यांनी आज मुंढे यांच्याकडून आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला.
- लोकांना विश्वासात घेवूनच काम करणार
शहरातील विकास कामे करण्याला आपण प्राधान्य देणार आहोत. परंतु त्याआधी मला येथील कामाचा अभ्यास करावा लागणार आहेत. त्यानंतर विकास कामे सुरू करण्यात येतील. मात्र ती सुरू करताना अग्रक्रमाने लोकांना विश्वासात घेवूनच कामे केली जातील, असे रामास्वामी यांनी मुंढे यांच्यासमोरच पत्रकारांशी बोलताना सांगितले.