मुंबई, 26 मार्च 2017 /AV News Bureau:
स्वच्छ भारत मिशनअंतर्गत राज्यातील सुमारे 14 हजार 137 ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्याची माहिती पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी विधान परिषदेत लेखी उत्तरातून दिली.
स्वच्छ भारत मिशनअंतंर्गत 2016-17 या वर्षात राज्यात 18 लाख 4 हजार 299 वैयक्तिक शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. जिल्हास्तरीय यंत्रणेमार्फत उघड्यावर शौचवधीस जाण्यापासून ग्रामस्थांना प्रतिबंध करण्यासाठी व शौचालय बांधून वापरण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. त्यासाठी गूड मॉर्निंग पथक, गृहभेटी, पोलीस अधिनियम 115 व 117 नुसार कारवाई, महिला बचत हट आणि शालेय विद्यार्थ्यांच्यामदतीने शौचालय बांधण्यासाठी व वापरासाठी उपक्रमांचे आयोजन आणि गवंडी प्रशिक्षम आदी उपाययोजना करण्यात येत असल्याचे उत्तर लोणीकर यांनी दिले. याबाबतचा तारांकीत प्रश्न अमरिशभाई पटेल, आनंदराव पाटील यांनी विचारला होता.