डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या उभारणीचा मार्ग मोकळा
मुंबई, 25 मार्च 2017/AV News Bureau:
भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतराष्ट्रीय दादर येथील इंदू मिल परिसरात उभारले जाणार आहे. मात्र ही साडेबारा एकरची जमीन वस्त्रोद्योग महामंडळाकडून राज्य सरकारकडे हस्तांतरीत करण्यात आली आहे. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आज या जमिनीची फाईल हस्तांतरित केली आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचा मार्ग मोकळा झाला आहे.
ऑक्टोबर 2015 ला बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं पंतप्रधानांच्या हस्ते भूमीपूजन झालं होतं. मात्र, भूमीपूजन होऊन दीड वर्ष होत आले तरी जमीन हस्तांतरित होत नव्हती. 1400 कोटी रुपये किंमतीच्या या जमिनीच्या बदल्यात राज्य सरकार वस्त्रोद्योग महामंडळाला टीडीआर देणार आहे.