ठाणे, 24 मार्च 2017/AV News Bureau:
चलनातून रद्द केलेल्या 500 आणि 1000 रुपये बदलण्यासाठी आणलेल्या तब्बल 33 लाख 50 हजार रुपये दराच्या नोटा कासारवडवली पोलिसांनी जप्त केल्या आहेत. याप्रकरणी दोन व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले असून चौकशी करण्यात येत आहे.
चलनातून रद्द केलेल्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा कमिशन घेवून बदलण्यासाठी घोडबंदर रोडवरील सीटी मॉलच्या गेटजवळ येणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त लोखंडे यांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले. तसेच त्यांच्याकडून 33 लाख 50 हजार रुपये किंमतीच्या नोटा जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी मतीम इब्राहीम शेख (42) आणि समीद फरीद शेख (22) यांची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मार्च 2017 मध्ये ठाणे पोलिसांनी कारवाईत जप्त केलेल्या नोटा पुढीलप्रमाणे-
- वर्तकनगर पोलीस स्टेशन – 1 कोटी 35 लाख 96 हजार रुपये
- चितळसर पोलीस स्टेशन – 31 लाख 98 हजार रुपये
- कासारवडवली पोलीस स्टेशन – 33 लाख 50 हजार रुपये
- परिमंडळ-5 एकूण – 2 कोटी 1 लाख 44 हजार रुपये