नवी मुंबई, 23 मार्च 2017/AV News Bureau:
कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने कोकण रेल्वेच्या सहकार्याने 25 आणि 26 मार्च रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस आणि सावंतवाडी रोड दरम्यान विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
- विशेष गाड्या
- गाडी क्रमांक 01167 एलटीटी- सावंतवाडी रोड ही 25 मार्च रोजी पहाटे 5.33 ला एलटीटीहून सुटेल आणि त्याच दिवशी सायंकाळी 3 वाजता सावंतवाडी रोड स्थानकात पोहोचेल.
- गाडी क्रमांक 01168 सावंतवाडी रोड- एलटीटी ही 26 मार्च रोजी सकाळी 11.15 ला सावंतवाडी रोड येथून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 11.45 ला एलटीटीला पोहोचेल.
- गाडीचे थांबे
या गाड्यांना ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळुण, रत्नागिरी, राजापुर रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ रेल्वे स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.
- डबे
या विशेष गाड्यांना 10 दुसऱ्या दर्जाच्या 10 चेअर कार, 8 दुसऱ्या दर्जाच्या आणि गार्ड ब्रेक व्हॅन 2 सामान्य दुसऱ्या दर्जाचे डबे जोडण्यात येणार आहेत.
- गाड्यांचे आरक्षण
विशेष शुल्क आकारून गाडी क्रमांक 01167 साठी 24 मार्चपासून तिकिटे उपलब्ध होणार आहेत.