रत्नागिरी, 23 मार्च 2017 /AV News Bureau:
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने आयोजित केलेल्या आंबा महोत्सवाचे उद्घाटन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अल्फान्सो मँगो अॅपचेही राज्यपालांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले.
कृषी विद्यापीठाच्या आवारात असलेले विविध जातीचे आंबे तसेच लागवडीसाठी लागणारे उपकरणे कोकण कृषी विद्यीपीठाने विकसित भाताच्या जाती, फळभाज्या आदींचे प्रदर्शन व माहिती आंबा महोत्सवात देण्यात आली.
- अल्फान्सो मॅन्गो ॲपचे उद्घाटन
राज्यपाल सी विद्यासागर राव व कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर व कुलगुरु डॉ. तपस भट्टाचार्य यांच्या उपस्थितीत मँगो ॲपचे अनावरण करण्यात आले. या ॲपमध्ये आंब्याच्या लागवडी पासून ते थेट बाजारपेठेपर्यंत विक्री व्यवस्था याबाबतची माहिती उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या ॲपसाठी डॉ. एच.जी. भावे, डॉ. बी.आर. दळवी, अतुल पाटील यांनी परिश्रम घेतले.