कोकणासमोर पाणी टंचाईचे संकट : अविरत वाटचाल विशेष

609 गावे आणि 2 हजार 158 वाड्या मदतीच्या प्रतिक्षेत

स्वप्ना हरळकर/AV News :

नवी मुंबई, 22 मार्च 2017:

सर्वाधिक पावसाची नोंद होणाऱ्या कोकणात यंदा पाणी टंचाईची झळ मोठ्या प्रमाणात बसण्याची शक्यता आहे. उन्हामुळे बाष्पीभवनाची प्रक्रिया जलदगतीने होवून पाणीसाठ्याची पातळी कमी होऊ लागली आहे. पुढच्या दोन महिन्यात कोकणातील अनेक गावांमध्ये पाण्याचा तुटवडा जाणवण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर कोकणातील पाच जिल्ह्यांमध्ये पाणी पुरवठा सुरळीत रहावा यासाठी पाणी टंचाईचा आराखडा तयार करण्यात आला असून सुमारे 21 कोटी रुपयांची तरतूद शासनाने तातडीने पुरविण्याची गरज आहे.

कोकणातल्या पाच जिल्ह्यांसाठी पाणीटंचाईचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यानुसार एप्रिल ते जून या कालावधीत कोकणातल्या पाच जिल्ह्यांमधील 609 गावांना आणि 2 हजार 158  वाड्यांना पाणीटंचाईची गंभीर समस्या भेडसावणार असल्याचे चित्र समोर आले आहे. या गावांमध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी सुमारे 2 हजार 158 वाड्यांसाठी 20 कोटी 92 लाख 86 हजार  रूपये खर्च करण्याचा कोकण विभागीय आयुक्तालयाने आराखडा तयार केला आहे. हा टंचाई आराखडा राज्य शासनाकडे मंजूरीसाठी पाठवण्यात आला असल्याची माहिती कोकण विभागीय सूत्रांनी दिली.

 एप्रिल ते जून या कालावधीसाठी अंदाज

pani arakhada table1