विधानसभेत 19 आमदारांचे निलंबन

कॉंग्रेसचे 9, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या 10 आमदारांचा समावेश

मुंबई, 22 मार्च 2017/AV News Bureau:

अथमंत्री  सुधीर मुनगंटीवार अर्थसंकल्प सादर करत असताना विधिमंडळात गोंधळ घालणा-या 19 आमदारांचे 31 डिसेंबरपर्यंत निलंबन करण्यात आले आहे. निलंबित आमदारांमध्ये कॉंग्रेसचे 9, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या 10 आमदारांचा समावेश आहे. या निलंबन कारावाईच्या निषेधार्थ विरोधी सदस्य़ांनी सभात्याग केला.

सुधीर मुनगंटीवार यांनी 18 मार्चला विधिमंडळात अर्थसंकल्प मांडला. त्यादरम्यान  कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या  सदयांनी अध्यक्षांपुढच्या जागेत जाऊन शेवटपर्यंत गदारोळ घातला होता. विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी सदस्यांना वारंवार सूचना देऊनही हा गोंधळ कायम होता. सभागृहात गोंधळ घालणे, बॅनर फडकावणे, घोषणाबाजी करणे, अवमान करणे, अर्थसंकल्पाच्या प्रती जाळणे, सभागृहाची प्रतिमा मलिन करणे, सभागृहाचे अवमान करणे  असे आरोप ठेवून या आमदारांचं निलंबन करण्यात आलं आहे.

काँग्रेसचे निलंबित आमदार

अमर काळे – काँग्रेस,  आर्वी मतदारसंघ, वर्धा

विजय वडेट्टीवार- काँग्रेस, ब्रह्मपुरी, चंद्रपूर

हर्षवर्धन सकपाळ – काँग्रेस, बुलडाणा

अब्दुल सत्तार – काँग्रेस, सिल्लोड, औरंगाबाद

डी.पी. सावंत – काँग्रेस, नांदेड उत्तर

संग्राम थोपटे – काँग्रेस, भोर, पुणे

अमित झनक – काँग्रेस, रिसोड, वाशिम

कुणाल पाटील – काँग्रेस, धुळे ग्रामीण

जयकुमार गोरे – काँग्रेस, माण – सातारा

राष्ट्रवादी काँग्रेसचे निलंबित आमदार

भास्कर जाधव – राष्ट्रवादी- गुहागर मतदारसंघ, रत्नागिरी

जितेंद्र आव्हाड – राष्ट्रवादी, कळवा, ठाणे

मधुसूदन केंद्रे – राष्ट्रवादी काँग्रेस, गंगाखेड, परभणी

संग्राम जगताप – राष्ट्रवादी, अहमदनगर

अवधूत तटकरे – राष्ट्रवादी, श्रीवर्धन, रायगड

दीपक चव्हाण – राष्ट्रवादी, फलटण – सातारा

नरहरी जिरवाळ – राष्ट्रवादी काँग्रेस  दिंडोरी, नाशिक

वैभव पिचड- राष्ट्रवादी, अकोले – अहमदनगर

राहुल जगताप – राष्ट्रवादी काँग्रेस, श्रीगोंदा अहमदनगर

दत्तात्रय भरणे – राष्ट्रवादी काँग्रेस, इंदापूर, पुणे