प्रवीण पोटे पाटील यांची विधान सभेत माहिती
मुंबई,२२मार्च 2017/AV News Bureau:
पुणे – बंगळुरु महामार्गावरील पुणे – सातारा या टप्प्याचे सहापदरीकरणाचे १४० कि. मी.पैकी ११४ की.मी.चे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम डिसेंबर 2017 पर्यंत पूर्ण करणार असल्याची माहिती राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी विधानसभेत दिली.
डॉ. सुजित मिणचेकर यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. पुणे- सातारा या महामार्गाच्या प्रकल्पामधील भूसंपादनामधील अडचणी, झाडे तोडण्यासाठी परवानगी, वन विभागाकडील परवानगी, सेवा वाहिन्यांचे स्थलांतर अशा विविध बाबींमुळे विलंब होत असून, ३५ कि.मी. चे काम अपूर्ण आहे. भुयारी रस्ते व भुयारी गटारे अपूर्ण असून डिसेंबर २०१७ पर्यंत काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी प्रश्नांची उत्तरे देताना विधानसभेत सांगितले.