मुंबई, 21 मार्च 2017/AV News Bureau:
काँग्रसेचे माजी खासदार निलेश राणे यांनी आज काँग्रेस प्रदेश सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला आहे. रत्नागिरी जिल्ह्याला पक्षाकडून अध्यक्ष मिळत नसल्यानं राणे नाराज असल्याची चर्चा होती. अशोक चव्हाण जाणून बुजून अध्यक्षपद देत नसल्याचं कारण राणेंनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटलं आहे. तब्बल दीड वर्ष रत्नागिरीला काँग्रेस जिल्हाध्यक्ष मिळाला नसल्याचं सांगत त्यांनी अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली आहे. दरम्यान पदाचा राजीनामा दिला असला तरी पक्षाचे काम करत राहणार असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले आहे.