ठाणे, 19 मार्च 2017/AV News Bureau:
ठाणे आणि रायगड जिह्यात कार्यरत असलेल्या कोकण पदवीधर या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून व शबरी सेवा समिती, भारतीय स्त्री जीवन विकास परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे जिह्यातील शहापुर तालुक्यातील पिवळी, केंद्रशाळा येथे 40 आदिवासी गर्भवती महिलांचे डोहाळजेवण पुरविण्यात आले. या कार्यक्रमाला महिलांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला.
सदर कार्यक्रमात ठाण्यातील शबरी सेवा समिती, भारतीय स्त्री जीवन विकास परिषद, लायन्स क्लब ऑफ कोपरी (पू.), कोकण पदवीधर संस्थेचे पदाधिकारी डॉ. वसंत काणे, डॉ. करंदीकर, सुभाष खासनीस, निमकर, डॉ. सोनल गुफ्ते, लायनेस सोनल कद्रेकर, जोशी, सुधागड प्रतिष्ठानचे सदाशिव लखीमले, मुकूंद टांकसाळे, लायनेस शशी शर्मा, लायनेस अरुणा मॅडम, पत्रकार अजय जाधव आदींनी विशेष परिश्रम घेऊन शहापुरातील पिवळी गावातील 40 आदिवासी गर्भवती महिलांना पोषण आहार व कपड्यांचे वाटप केले.