मुख्यमंत्र्यांची विधान परिषदेत माहिती
मुंबई, 19 मार्च 2017/AV News Bureau:
नवी मुंबईतील गोठिवली, घणसोली परिसरातील खारफुटीचे क्षेत्र संरक्षित आहे. या क्षेत्रावर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण झालेले नाही, अशी माहिती मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली.
घणसोली येथील खाडीकिनाऱ्यालगत अनधिकृत इमारती असल्याबाबतचा तारांकीत प्रश्न जयंत पाटील यांनी उपस्थित केला होता.
घणसोली गावाशेजारी सिडकोच्या महामंडळाच्या भुखंडावर बेकायदा चाळी बांधण्यात आल्याचे आढळून आले. मात्र सिडको आणि नवी मुंबई महापालिका प्रशासनाने जानेवारीत ही बांधकामे तोडली आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी आपल्या उत्तरात नमूद केले आहे.