अर्थसंकल्पातील महत्वाचे मुद्दे

मुंबई, 18 मार्च 2017 /AV News Bureau:

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज राज्याच्या अर्थसंकल्प  सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी अनेक मुहत्वाचे मुद्दे मांडले आहेत. या  अर्थसंकल्पात कृषीक्षेत्र,  युवा, आरोग्य, शिक्षण ऊर्जा, पायाभूत सुविधा आदी सर्वच क्षेत्रांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.  या अर्थसंकल्पातील काही महत्वाचे मुद्दे –

कृषीक्षेत्रासाठी

  • जलसंपदा विभागासाठी 8 हजार 233 कोटी रूपयांची तरतूद
  • प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील 26 प्रकल्पांचा समावेश. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंततर 5 लाख 56 हजार हेक्टर एवढी अतिरिक्त सिंचन क्षमता निर्माण होणार आहे.
  • सूक्ष्म सिंचन पध्दतीसाठी शेतक-यांना सवलतीच्या दराने कर्ज उपलब्ध करून देणार
  • डॉ.पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेसाठी 125 कोटी 64 लाखांची तरतूद
  • शेतमालासाठी पणन विभागामार्फत गोदाम व्यवस्थेमध्ये सुधारणा करणार
  • थेट पणन व खाजगी बाजार यांना चालना देण्यासाठी राज्यात 10 ठिकाणी अग्रो मार्केट उभारणे, संत शिरोमणी आठवडा बाजार अभियानाची व्याप्ती वाढविणे, शेतमाल तारण ठेवून तातडीने कमी व्याजदराने कर्ज मिळविण्यासाठी योजनेची व्याप्ती वाढविणे यासाठी 50 कोटींची तरतूद
  • कोकणात काजू लागवडीसीठी आणि प्रक्रियेचा तसेच काजू बोंडावरील प्रक्रीया कार्यक्रम राबविण्यात येणार.
  • कृषी क्षेत्राचे उत्पन्न वाढविण्यासाठी योजना लागू करण्यात येणार आहे. शेतकरी उत्पादक कंपन्या आणि शेतकरी गट स्थापन करणार. वीस शेतक-यांचा 1 गट व त्यांचा किमान 100 गट असे स्थापन केले जाणार आहे. यासाठी 200 कोटी रूपयांचा निधी प्रस्तावित
  • मराठवाड्यातील 4 हजार गावांतील शेती दुष्काळापासून संरक्षित करण्यासाठी  तसेच विदर्भातील पूर्णा खो-यातील 11 हजार गावांमधील क्षारक्षमतेच्या समस्येवर मात करण्यासाठी जागतिक बॅंकेकडून अर्थसहाय्याने 4 हजार कोटींचा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे.
  • 80 लक्ष शेतक-यांना मृदापत्रिकेचे वाटप करणयात आले आहे. 2012 पर्यंत इतर शेतक-यांनाही वाटप होणार.
  • यावतमाळ, नाशिक व पेठ, जिल्हा सांगली येथे शासकीय कृषी महाविद्यालये स्थापन केली जाणार आहे.

युवा पिढीसाठी

  • 15—45 या वयोगटातील युवकांना रोजगार देण्यासाठी प्रमोद महाजन कौशल्य योजनेअंर्तगत 1 हजार 22 हजार युवकांना रोजगार तसेच प्रशिक्षण देणार. त्यासाठी 35 उद्योगसमूहांसोबत सामंजस्य करार. 57 टक्के महिलांचा समावेश
  • 10 हजार गवंडी कामगारांना प्रशिक्षण दिले जाणार
  • महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत 1 एप्रिलपासून 192 रूपयांवरून 210 रूपये होणार आहे.
  • परसातील कुककुटपालनासाठी 302 तालुक्यांत सघन कुककुटपालन विकास गट सुरू करण्यात येणार आहे.
  • राज्यातील दुर्गम भागात 349 फिरते पशुवैद्यकीय चिकित्या रूगणालय सुर करणात येणार आहे.
  • समुद्रकिना-यारील कांदळवनांत खेकडा, ऑईस्टर, मुसल्स् यांचे उत्पादन करण्यासाठी 15 कोटींचा निधी
  • बांबू क्षेत्राच्या विकासासाठी महाराष्ट्र राज्य बांबू प्रवर्तन यंत्रणा सुरू करणार
  • असंघटित कामगारांसाठी स्वतंत्र असंघटित कामगार सामाजिक सुरक्षा मंडळ स्थापन करणार

शिक्षण

  • सातारा येथीस सैनिकी शाळेप्रमाणेच चंद्रपूर येथेही सैनिकशाळा बांधण्यात येणार आहे त्यासाठी 200 कोटी रूपये प्रस्तावित
  • औरंगाबाद येथे राष्ट्रीय विधी विद्यापीठ सुरू होत आहे. मुंबई, नागपूर, औरंगाबाद या तीन विधी विद्यापीठांचा विकास करण्यासाठी 39 कोटी 28 लाखांचा निधी प्रस्तावित

पायाभूत सुविधा

  • अहमदनगर- बीड- परळी-वैजनाथ, वर्धा-यवतमाळ-नांदेड, वडसा देसाईगंज- गडचिरोली या तीन रेल्वे प्रकल्पांसाठी 150 कोटींचा निधी
  • मेरीटाईम बोर्डाच्या माध्यमातून जेएनपीटीने वाढवण येथे प्रकल्प उभारला जात आहे. हे सॅटेलाईट टर्मिनल असणार आहे.
  • बंदर जोडणी प्रकल्पसाठी 70 कोंटीच्या निधीची तरतूद
  • कोकणातील आंबा आखाती देशात निर्यात होतो. त्यासाठी समुदामार्गे वाहतुकीसाठी आवश्यक त्या मुलभूत सुविधा देण्यात येणार
  • सागरमाला कार्यक्रमाअंतर्गत 8 जेट्टींच्या बांधकामासाठी  71 कोटी 78 लाख खर्च असून त्यातील 50 टक्के निधी राज्य सरकार आणि उर्वरित सागरमाला कार्यक्रमाअंतर्गत करण्यात येणार.
  • नागपूरला आंतराष्ट्रीय विमानतळ करणार
  • शिर्डी विमानतळा विकास

उर्जा

  • हरित इमारती बांधणार
  • राज्यात पहिल्या टप्यात 750 मेगा वॉटचा सौर उर्जा प्रकल्प नियोजित
  • स्वच्छता
  • स्वच्छ भारत मिशन अतर्गत 10 जिल्हे 103 तालुके, 14 हजार ग्रामपंचायती हगणदारीमुक्त घोषित
  • पाणीपुरवठा
  • मराठवाड्यात दुष्काळासाठी पाणी पुरविण्यासाठी एकात्मिक ग्रीड पध्दत वापरून पाणी पुरविणार. त्यासाठी 15 हजार कोटींची तरतूद

आरोग्य

  • औरंगाबाद येथे कर्करोग संशोधन केद्रांसाठी 126 केटी महसूल विभाग निहाय कर्करोग उपचार केंद्र उभारणार
  • भारतात स्तनाचा, मुखाचा, गर्भाशय मुख कर्करोग आढळतो. त्याचे निदान लवकर व्हावे यासाठी मॅमोग्राफी, कोल्पोल्कोप, व्हेलस्कोप मशीन राज्यातील सरकारी रूग्णालयात उपलब्ध करणार.
  • सिटी स्कॅन मशीन निवडक 31 रूग्णालयांमध्ये उलपब्ध करणार.

पर्यावरण

  • नमामी चंग्रभागा या अभियानाअंतर्गत मुळा, मुठा नदीच्या प्रदुषणमुक्तीसाठी 990 कोटी 26 लाखांचा निधी मंजूर.
  • वणव्यांच्या घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी चंद्रपूर येथे प्रत्यक्ष कृती दलाची स्थापना करणार
  • आदिवासी योजना
  • स्वतंत्र ओबीसी मंत्रायल सुरू केले आहे. त्यासाठी 2 हजार 384 कोटी
  • एकात्मिक बालविकास सेवा योजनेत अंगणवाडी बालकांसाठी 310 कोटी 57 लाखांचा निधी
  • महिला सक्षमीकरणासाठी महिला आयोगाला सक्षम करण्यासाठी 7 कोटी 94 लाखांचा निधी उपलब्ध केला जाईल.
  • जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थीनींना सॅनिटरी नॅपकीन देण्यासाठी अस्मिता योजना
  • पर्यटन
  • सिंधुदुर्ग जिल्हातील तिल्लारी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यासाठी 100 कोटींची तरतूद