राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा विश्वास
मुंबई,17 मार्च 2017/A News Bureau:
राज्याची सत्ता हाती घेतली तेव्हा विकासदर 5.4 टक्के होता तो आता दोन वर्षानंतर 9.4 टक्के आहे. येत्या दोन वर्षांत तो निश्चित दोन अंकी होईल, असा दावा राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे अर्थमंत्री दीपक केसरकर यांच्या सोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत केला.
राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर झाल्याच्या पार्श्वभूमीवर व राज्य अअर्थसंकल्प सादर करण्यास एक दिवस असताना विधानभवनातील पत्रकार कक्शात मुनगंटीवार बोलत होते. यावेळी आपले राज्य वेगाने प्रगतीमार्गावर निघाल्याचा दावा त्यांनी केला.
दोन वर्षांपूर्वी कृषी क्षेत्रात रोजगार दर -11.2 होता, तो आता अधिक12.5 इतका आहे. दरडोई उत्पन्न 1लाख 19 हजार 379 रुपये होते. ते आता 1 लाख 47 हजार 399 इतके झाल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले.
अर्थमंत्री मुगंटीवार यांनी राज्याचे कृषीक्शेत्र1970 साली जे 4.28 हेक्टर वरून 1.44 हेक्टर इतके झाल्याचे सांगतानाच अल्पभूधारकांची संख्या यामध्ये 1कोटी 36 लाख 980 खातेदारांपैकी 1 कोटी 7 लाख 2 हेक्टरपर्यंत जमीन असलेले आहेत. तर 1 हेक्टरप्रर्यंत शेती असेललेले 67 लाख 96 हजार आहेत त्यांना कर्जमाफी देणे हे आमच्यासमोर आव्हान आहे , असेही त्यांनी सांगितले.
- मंत्रीपद मोठे नाही
अर्थराज्यमंत्री केसरकर यांनी आपल्या पक्षाचा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला पाठिंबा असल्याचे सांगितले. शिवसेना पक्शप्रमुखांच्या निर्णयापुढे मला मंत्रीपद मोठे नाही . मात्र त्यांनीच आम्हाला सरकारचे काम करा अशी परवानगी दिली आहे. त्यामुळे जनतेच्या कल्याणासाठी आम्ही काम करीत आहोत,असेही केसरकर म्हणाले.