नवी मुंबई, 16 मार्च 2017/AV News Bureau:
गावठानातील घरांना सनद मिळावी , गर्जेपोटी घरे नियमानुसार नियमित करावी, साडेबाराटक्के मिळावे यासाठी नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त गेल्या तीन दिवसापासून बेमुदत उपोषणास बसले आहेत. तब्बल 40 तरुण उपोषणास बसले बसून, त्यातील दोन उपोषणकरत्यांची तब्येत बिघडली आहे. मात्र जोपर्यंत न्याय मिळत नाही,तोपर्यंत मागे हटणार नाही, असा इशारा या उपोषणकर्त्यांनी दिला आहे.
नवी मुंबई तील गेल्या 45 वर्षापासून आपल्या हक्कापासून वंचित असलेल्या नवी मुंबई प्रकल्प ग्रस्तांच्या मागण्यासाठी येथील आगरी कोळी युथ फाऊंडेशनच्यावतीने उपोषणाची हाक दिली आहे. या हाकेला साद देत 40 तरुण तरुणी बेमुदत उपोषणास बसले आहेत. यातील राजेश मढवी, रोशन भोईर या दोघांची प्रकृती खालावली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आगरी कोळी युथ फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
या आंदोलनकर्त्यांना भेटण्यासाठी राज्यचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज नवी मुंबईला भेट दिली. मुंबईतल्या अनधिकृत कँम्पाकोलातील धनदांडग्याचा आवाज वर्षा बंगल्या पर्यंत पोहचला. पण या गरीब प्रकल्पग्रस्त शेतकर्यांचा आवाज पोहचत नाही. त्यामुळे या गरीबांचा आवाज आम्ही सरकारपर्यंत पोहोचवू, असे आश्वासन विखे पाटील यांनी उपोषणकर्त्यांना दिले.