“कोकणातील शिमगा आणि गणपती’ पुस्तकरुपात

 

मुंबई, 15 मार्च 2017/AV News Bureau:

कोकणातील शिमगा आणि गणपती या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच मुंबईत करण्यात आले. कुणबी समाजोन्नती संघाचे उपाध्यक्ष सदानंद काष्टे व युवाध्यक्ष माधव कांबळे यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. चंद्रकांत गोवळकर या पुस्तकाचे लेखक आहेत. यावेळी निमंत्रक संदेश झिमण, संतोष पवार व कुणबी युवाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोकणातील बहुसंख्येने लोक आज मुंबई पुणे सारख्या शहरात पोट भरण्यासाठी आले आहेत. आपले उत्सव  साजरे करण्यासोबत करियर, व्यवसाय याचेही उद्दातीकरण व्हायला हवे. नव्या पिढीला कोकणातील शिमगा व गणपती तसेच इतर उत्सव माहित असावेत यासाठी लेखकाने हे पुस्तक लिहिले आहे. यापुढेही  अशाप्रकारचे लिखाण होवो, अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्क केली.