‘व्हेअर इज माय बस’ या अॅपचे महापौरांच्या हस्ते उद्घाटन
ठाणे,14 मार्च 2017/AV News Bureau:
प्रवाशांना परिवहन बसेसची सेवा अधिक सुलभपणे देता यावी यासाठी ठाणे परिवहनसेवेने प्रवाशांसाठी ‘व्हेअर इज माय बस’ हे अॅप उपलब्ध करुन दिले आहे. या अॅपचे उद्घाटन आज महापौर मिनाक्षी राजेंद्र शिंदे यांच्या हस्ते झाले.
मुंबईतील केपीएमजी अॅडव्हायजरी सर्व्हीसेस प्रा.लि कंपनीने हे अॅप तयार केले आहे. या अॅपच्या माध्यमातून प्रवाशांना परिवहन सेवेची बस किती वेळात बसथांब्यावर अपेक्षित आहे, तसेच बस कोणत्या मार्गावरुन धावणार आहे, तिकिटाची किमंत, बसमध्ये उपलब्ध असलेल्या सीटसची संख्या आदी सर्व माहिती एकाच वेळी उपलब्ध् होणार आहे. प्रवासी ज्या बसथांब्यावर उभे असतील तेथे बस किती वेळात पोहचेल याचीही माहिती या अॅपच्या माध्यमातून मिळणार आहे. बसचे तिकीट, पास देखील ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. ठाणे परिवहनच्या नीळकंठ येथील आगारामध्ये या ऑनलाईन सेवेचे कंट्रोल असणार आहे.
प्रवाशांनी whereismybus हे अॅप आपल्या मोबाईलवर डाऊनलोड करुन घेतल्यास ठाणे शहरातील परिवहनच्या सर्व बसेसची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.