मुंबई, 14 मार्च 2017/AV News Bureau:
कोकण विभागीय स्तरावर आज लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 13 अर्ज सादर करण्यात आले. यावेळी उपायुक्त (सामान्य) शिवाजी कादबाने उपस्थित होते.
आतापर्यंत झालेल्या लोकशाही दिन कार्यक्रमात एकूण प्रलंबित अर्जांची संख्या 33 असून आज निकाली काढण्यात आलेल्या अर्जांची संख्या 16 असून एकूण 30 तक्रारी प्रलंबित आहेत.
कोकण विभागाअंतर्गत पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी जिल्हे येतात. या जिल्ह्यांतील नागरिकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी कोकण विभागीय स्तरावरील लोकशाही दिनाचे सीबीडी येथील कोकण भवनमध्ये आयोजन करण्यात येते.