पर्रिकरांच्या शपथविधीविरोधात काँग्रेस न्यायालयात

काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात याचिका

पणजी, 13 मार्च 2017:

मनोहर पर्रिकर गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याच्या एक दिवस आधी काँग्रेसने सरकार स्थापनेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. उद्या सकाळी याप्रकरणी सुनावणी होणार आहे.

गोवा विधानसभेत सर्वाधिक 17 जागा मिळवून काँग्रेस अव्वल स्थानावर आहे. मात्र 24 तासात नेता निवडीबाबत निर्णय झाला नाही. तर दुसरीकडे भाजपने इतर पक्षांशी मोट बांधत सरकार स्थापनेचा दावा केला आहे. भाजपला महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष, गोवा फॉरवर्ड पार्टी आणि अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भाजपने राज्यपालांसमोर सरकार स्थापनेचा दावा केला आहे. त्यामुळे राज्यपालांनी पर्रिकर यांना मुख्यमंत्री नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच त्यांना १५ दिसांत बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे. यावर काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करीत पर्रिकर यांच्या शपथविधीला स्थगिती देण्याची मागणी केली आहे.