2768 बेशिस्त टॅक्सीचालकांचे परवाने रद्द

taxi

मुंबई, 12 मार्च 2017/ AV News Bureau:

प्रवाशांसोबत बेशिस्त वर्तन करणे, भाडे नाकारणे आदी तक्रारींवरून परिवहन विभागाने कायदेशीर कारवाई करून 2768 बेशिस्त टॅक्सीचालकांचे परवाने आणि अनुज्ञप्ती रद्द केल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी विधान परिषदेत लेखी उत्तराद्वारे दिली.

मुंबईतील टॅक्सीचालकांच्या असभ्य वर्तणुकीबाबत जनार्दन चांदूरकर यांनी तारांकीत प्रश्न उपस्थित केला होता. टॅक्सीचालकांकडून जवळचे भाडे नाकारणे, प्रवाशांसोबत असभ्य वर्तणुक करणे, मीटरपेक्षा अधिक भाडे आकारणे आदी तक्रारी नागरिकांकडून वारंवार केल्या जातात. यावर रावते यांनी स्पष्ट केले की, अशा स्वरुपाच्या तक्रारी परिवहन कार्यालयाकडे दूरध्वनी, ई मेलद्वारे व लेखी स्वरुपात प्राप्त होतात. त्यानुसार मुंबईतील तीन प्रादेशिक परिवहन कार्यालयांनी एप्रिल 2016 ते जानेवारी 2017 या कालावधीत प्रवाशांच्या तक्रारीनुसार कारवाई केल्याची माहिती रावते यांनी आपल्या लेखी उत्तरात दिली आहे.

  • प्राप्त तक्रारी 3 हजार 893
  • निकाली काढलेल्या तक्रारी 2768
  • वसूल केलेला दंड 12 लाख 39 हजार 700 रुपये
  • परवानेव अनुज्ञप्ती निलंबनाची प्रकरणे 2768