नवी दिल्ली, 10 मार्च 2017:
कला, कृषी, विधी, वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अशा क्षेत्रांमध्ये परदेशी विद्यापीठात उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सरकारी शिष्यवृत्त्या असल्याची माहिती मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉ. महेंद्रनाथ पांडे यांनी राज्यसभेत लेखी उत्तराद्वारे दिली.
- अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी नॅशनल ओव्हरसिज स्कॉलरशिप फॉर शेड्युल्ड ट्राइब स्टुडन्टस्
- अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी नॅशनल ओव्हरसिज स्कॉलरशीप फॉर शेड्युल्ड कास्ट स्टुडन्टस्,
- अल्पसंख्याक समाजातल्या विद्यार्थ्यांसाठी “पढो परदेश” या योजनांचा यात समावेश आहे.
इतर मागासवर्गीयांसाठी आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी परदेशात शिकण्याकरिता शैक्षणिक करावरच्या व्याजदरात सवलत देण्यासाठी डॉ. आंबेडकर योजना आहे. याखेरीज विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि वैद्यकीय क्षेत्रात संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ओव्हरसिज डॉक्टोरल फेलोशिप प्रोग्राम सरकारतर्फे राबवला जातो,असेही पांडे यांनी म्हटले आहे.