महिला दिनानिमित्त राष्ट्रपतींचा संदेश
नवी दिल्ली, 8मार्च 2017
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी भारतातील आणि जगाच्या इतर भागातील महिलांना शुभेच्छा दिल्या.
आपला अतुलनीय दयाभाव, सहनशक्ती आणि कठोर परिश्रमांनी भारतीय महिलांच्या पिढ्यानपिढ्यांनी देशाच्या प्रगतीत अमूल्य योगदान दिले आहे. त्यांच्या सक्षमीकरणासाठी आणि राष्ट्र उभारणीतील त्यांच्या समान सहभागासाठी भारत सरकारने ऐतिहासिक कायद्यांची आणि उपक्रमांची अंमलबजावणी केली आहे. स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी आणि मुलींना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी “ बेटी बचाव, बेटी पढाव” हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे, असे राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
स्त्री-पुरुष समानतेबाबत आणि महिला सक्षमीकरणाबाबत आपली प्रतिबद्धता प्रकट करा. आपल्या क्षमता विकसित करण्यासाठी, आकांक्षाची जाणीव होण्यासाठी आवश्यक असलेला पाठिंबा त्यांना देऊया. सुरक्षा, सन्मान आणि समानतेचा आनंद त्यांना घेऊ द्या. तो त्यांचा हक्क आहे.” असे या दिनानिमित्त मी भारतीय जनतेला आवाहन करतो, असे प्रतिपादन राष्ट्रपतींनी केले.