मुंबई 8 मार्च 2017/AV News Bureau:
गृहिणींकडे असणार्या पाककौशल्याला व्यावसायिकेतेचे रुप यावे, त्यांनाही घरबसल्या रोजगार प्राप्त व्हावा, या हेतूने अमेरिकेत वास्तव्यास असणार्या समीर पाथरे या तरुणाने गृहिणी आणि बचतगटांसाठी होमफुडीश नावाची वेबसाईट तयार केली आहे. या संकेतस्थळाचे औपचारीक उद्घाटन नुकतेच गृहिणी आणि पाककलेत प्रवीण असलेल्या शालिनी साळवी यांच्या हस्ते करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते जयंत दांडेकर प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते.
कन्नमवार नगरातील गोरखा हॉल येथे झालेल्या दिमाखदार कार्यक्रमास महिला वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता.http://www.homefoodish.com असे या संकेतस्थळाचे नाव आहे.