नवी मुंबई, 8 मार्च 2017/AV News Bureau:
होळीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गर्दी लक्षात घेवून मध्य रेल्वेने कोकण रेल्वेच्या सहकार्याने सीएसटी आणि करमाळी/सावंतवाडी रोड/ यशवंतपुर दरम्यान 9 विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. 11 ते 13 मार्च दरम्यान या विशेष गाड्या चालविण्यात येणार आहे. या गाड्यांचे तिकिट बूकींग उद्या 9 मार्चपासून सुरू होणार आहे.
1)सीएसटी-करमाळी विशेष (2)
- गाडी क्रमांक 02003 ही 12 मार्च रोजी पहाटे 1.10 ला सीएसटी स्थानकातून सुटेल आणि त्याच दिवशी दापीर 12.20 ला करमाळी रेल्वे स्थानकात पोहोचेल.
- गाडी क्रमांक 02004 ही 12 मार्चला दुपारी 1.35 ला करमाळी स्थानकातून सुटेल त्याच दिवशी रात्री 11.20 ला सीएसटी स्थानकात पोहोचेल.
- थांबे
या गाड्या दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळुण, रत्नागिरी, राजापुर रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिविम रेल्वे स्थानकात थांबणार आहेत.
- डब्यांची रचना
या गाड्यांना 1 टु टायर एसी, 2 थ्री टायर एसी, 4 स्लीपर क्लास , 9 सेकंड क्लास डबे जोडण्यात येणार आहेत.
2)मुंबई सीएसटी- सावंतवाडी रोड विशेष (2)
- गाडी क्रमांक 01103 ही 11 मार्चला पहाटे 1.10 ला सीएसटीहून सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 12.20 ला सावंतवाडी रोड स्थानकात पोहोचेल .
- गाडी क्रमांक 01104 ही 11 मार्चला दुपारी 2.15 ला सावंतवाडी रोडहून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 11.55 ला मुंबई सीएसटीला पोहोचेल.
- थांबे
गाडीला दादर, ठाणे, पनवेल,रोहा,माणगाव, खेड, चिपळुण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापुर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.
- डब्यांची रचना
या गाडीला 1 एसी चेअर कार, 10 सेकंड क्लास चेअर कार, 2 सेकंड क्लास डबे जोडण्यात येणार आहेत.
3) मुंबई सीएसटी- सावंतवाडी रोड (2)
- गाडी क्रमांक 01105 ही 12 मार्चला पहाटे 1.30 ला सीएसटीहून सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 12.20 ला सावंतवाडी रेल्वे स्थानकात पोहोचेल.
- गाडी क्रमांक 01106 ही 12 मार्चला दुपारी 3 वाजता सावंतवाडी रोडहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 12.40 ला मुंबई सीएसटीला पोहोचेल.
- थांबे
या गाडीला दादार, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड,चिपळुण, संगमेश्वर रोड,रत्नागिरी, राजापुर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.
- डब्यांची रचना
या गाड्यांना 1 एसी चेअर कार, 10 सेकंड क्लास चेअर कार, 2 सेकंड क्लास डबे जोडण्यात येतील.
4) मुंबई सीएसटी- सावंतवाडी रोड विशेष (2)
- गाडी क्रमांक 01095 ही 13 मार्चला पहाटे 1.10 ला मुंबई सीएसटीहून सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 12.20 ला सावंतवाडी रोडला पोहोचेल.
- गाडी क्रमांक 01096 ही 13 मार्चला दुपारी 3 वाजता सावंतवाडी रोडहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 12.40 ला मुंबई सीएसटी स्थानकात पोहोचेल.
- थांबे
या गाड्यांना दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणसाव, खेड, चिपळुण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापुर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.
- डब्यांची रचना
या गाड्यांना 1 एसी चेअर कार, 10 सेकंड क्लास चेअर कार, 2 सेकंड क्लास डबे जोडण्यात येणार आहेत.
5) मुंबई सीएसटी- यशवंतपुर विशेष (1)
- गाडी क्रमांक 01185 हा 13 मार्चला सायंकाळी 5.15 ला सीएसटीहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री 8 वाजता यशवंतपुरला पोहोचेल.
- गाड्यांना थांबे
या गाड्यांना लोणावळा, पुणे, मिरज, बेळगावी, लोंडा, धारवाड, हुबळी,दावनगिरी, बिरुर जंक्शन या स्थानकांवर थांबा देण्यात येईल.
- डब्यांची रचना
या गाडीला 1 टु टायर एसी, 4 थ्री टायर एसी, 6 स्लीपर क्लास आणि 2 सेकंड क्लास डबे जोडण्यात येणार आहेत.
- तिकिट बूकींग
होळीनिमित्त सोडलेल्या 02003,01103,01105,01095 आणि 01185 या विशेष गाड्यांचे आरक्षण 9 मार्चपासून सुरू होणार आहे.