गूगलचा महिलांना डूडलद्वारे सलाम

नवी मुंबई, 8 मार्च 2017 /AV News Bureau:

आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून गूगलचे डूडल सजविण्यात आले.  गूगलने कला ते विज्ञान अशा सर्वच क्षेत्रात उंच भरारी मारणाऱ्या महिलांच्या योगदानाला सलाम केले आहे.

8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येत आहे. हा महिला दिन विविध पद्धतीने साजरा केला जात आहे. गूगल या सर्च इंजिननेदेखील महिला दिनानिमित्त आपले विशेष डूडल तयार केले आहे. या डूडलमध्ये विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा मागोवा घेणारे आठ फोटो तयार केले आहेत. यामध्ये एक वयस्क महिला लहान मुलीला विविध क्षेत्रात आपली छाप सोडणाऱ्या महिलांबाबत गोष्ट सांगत आहे. त्यानंतर ती मुलगी संगीत, टेनिस,वैद्यकीय क्षेत्र, नृत्य, वैमानिक, अंतराळवीर अशा विविध 13 क्षेत्रातील महिलांच्या योगदानाबाबत विचार करीत आहे.