महिला दिनानिमित्त महिला पत्रकारांचा सन्मान

 

पनवेल, 7 मार्च 2017/AV News Bureau:

जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला (मंगळवारी) पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्या वतीने शहरातील महिला पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.

पनवेल येथील शासकीय विश्रामगॄह येथे झालेल्या कार्यक्रमात तॄप्ती पालकर(साम टि. व्ही), स्वप्नाली देसार्इ(नवी मुंबर्इ आवाज टी. व्ही.), चेतना वावेकर(कर्नाळा टि. व्ही. ), सीमा भोर्इर(दै. पुढारी), ऋतुजा महामुनी(दै. सकाळ ) या महिला पत्रकारांचा सत्कार करण्यात आला आणि त्यांना पुढील यशस्वी वाटचालीकरीता शुभेच्छा देण्यात आल्या.

या कार्यक्रमास मंचाचे सल्लागार ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील, अध्यक्ष हरेश साठे, उपाध्यक्ष राजू गाडे, सरचिटणीस नितीन कोळी, कार्यकारिणी सदस्य अविनाश कोळी, विवेक पाटील, संजय कदम, प्रशांत शेडगे, प्रविण मोहोकर तसेच संदीप भगत, योगेश पाटील, लक्ष्मीकांत ठाकूर, आदी उपस्थित होते.

महिला सर्व क्षेत्रात आघाडीवर आहेत. त्यांचे विविध क्षेत्रातील कार्य वाखाण्याजोगे असून समाजातील सर्व घटकांसाठी प्रेरणादायी आहे. समाजातील दोष दूर करण्याचा व समाजाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न पत्रकारांकडून होत आहे. यामध्ये महिला पत्रकारांचा योगदान मोठे आहे, असे मत माधव पाटील यांनी व्यक्त केले.

यावेळी स्वप्नाली देसार्इ, तॄप्ती पालकर, चेतना वावेकर, सीमा भोर्इर, ऋतुजा महामुनी यांनी सत्काराबद्दल पत्रकार मंचाचे आभार मानले.