ठाणे,3 मार्च 2017/AV News Bureau:
जागतिक महिला दिनानिमित्ताने ठाणे महानगरपालिका आणि अच्युत पालव यांच्या स्कूल ऑफ कॅलिग्राफी यांच्या संयुक्त विद्यमाने आदिशक्ती-अक्षरशक्ती या सुलेखनकलेच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. टाऊन हॉल, ठाणे येथे 8 मार्च रोजी सायंकाळी 5.30 वाजता प्रसिध्द फॅशन डिझायनर व सी.ए. कन्सलटंट गीता कॅसलिनो यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उदघाटन होणार आहे. तन्वी हर्बलच्या संचालिका डॉ. मेधा मेहंदळे या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या असणार आहेत. 25 हून अधिक विद्यार्थ्यांच्या सुमारे शंभर कलाकृती यामध्ये असणार आहेत. 8 ते 12 मार्च या कालावधीत हे प्रदर्शन सायंकाळी 4 ते रात्री 8 आणि शनिवार व रविवार सकाळी 11 ते सायंकाळी 8 या वेळात खुले राहणार आहे. दररोज संध्याकाळी या विद्यार्थ्यांची प्रात्यकक्षिक आयोजित करण्यात आली आहेत. होळीच्या निमित्ताने 11 मार्च रोजी सायंकाळी 6.30 वाजता 5 फूट बाय 40 फूट लांबीच्या कागदावर सर्व कलाकारांच मेगा डेमॉनस्ट्रेशन होणार आहे.