ठाणे, 3 मार्च 2017/ AV News Bureau:
जागतिक महिला दिनानिमित्त श्री अंबिका योग कुटीर, ठाणे येथे 8 एक विशेष कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम विनामूल्य असून यात PCOD या तरुणींमध्ये होणा-या विकारासंबंधी मार्गदर्शन केले जाणार आहे.
PCOD-Polycystic Ovarian Disorder यामध्ये मासिक चक्रात बदल होऊन बीज निर्मितीच्या कार्यात अडथळा निर्माण होतो व संप्रेरकांचे असंतुलन होऊन वंध्यत्वाच्या समस्येलाही सामोरे जावे लागते. सध्याच्या काळात ताणतणाव, बदलती जीवनशैली व आहार यामुळे तरुणींमध्ये या विकाराचे प्रमाण खूप वाढले आहे.
मागील दोन वर्षांत कुटीरमध्ये योगाभ्यासाच्या सहाय्याने PCOD असलेल्या साधकांचे व्याधीनिवारण होऊन वंध्यत्व कसे दूर झाले याबाबत कुटीरमधील तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. तसेच रोगमुक्त झालेले साधक योगक्रियांचे प्रात्यक्षिक दाखविणार असल्याची माहिती कुटीरच्या वतीने देण्यात आली आहे.