परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचा इशारा
ठाणे, 5 फेब्रुवारी 2017/AV News Bureau:
मुंबई, ठाणे,कल्याण, भिवंडीसह राज्याच्या इतर भागात रिक्षाचालकांची मुजोरी सहन केली जाणार नाही तसेच एसटी चालक, वाहक किंवा कर्मचारी यांच्याशी मुजोरपणे वागणा-यांची गय केली जाणार नसल्याचा स्पष्ट इशारा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिला.
भिवंडी आणि कल्याणमध्ये एसटी चालक तसंच पोलिसांवर रिक्षाचालकांनी हात उगारण्याच्या घटना नुकत्याच घडल्या. त्या पार्श्वभूमीवर दिवाकर रावते यांनी आज कल्याणला भेट दिली. न्यायालयाने रिक्षा आणि टॅक्सीचालकांची मुजोरी मोडून काढण्याबाबत आदेश दिले आहेत. त्याचे आम्ही काटेकोर पालन करु असेही रावते यांनी सांगितले. आम्हाला रिक्षाचालकांच्या व्यवसायाचा आदर आहेच. मात्र मुजोर रिक्षाचालकांना त्यांच्या संघटनांनी धडा शिकवणं आवश्यक आहे, म्हणजे अशा दुर्दैवी घटना घडणार नाहीत, अशी अपेक्षाही दिवाकर रावतेंनी यांनी यावेळी व्यक्त केली.