मुंबई, 4 मार्च 2017 /AV News Bureau:
आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक डॉ कृष्णा किरवले यांची कोल्हापूर येथे हत्या झाल्याचे शुक्रवारी दुपारी उघडकीस आले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
डॉ. किरवले हे कोल्हापूरमधील म्हाडा वसाहतीत राहत होते. शुक्रवारी दुपारी ते राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यांच्या हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
डॉ कृष्णा किरवले यांच्या हत्येची सखोल चौकशी करून गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना रामदास आठवले
प्रा. डॉ. कृष्णा किरवले यांच्या हत्येची घटना निषेधार्ह असून त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीचा सच्चा पाईक आणि पुरोगामी विचारांचा पुरस्कर्ता हरपला असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.