नवी दिल्ली, 2 मार्च 2017:
सध्या निवृत्ती वेतन हक्काचे अंतिम व्यवहार पूर्ण करण्यासाठीच आधार कार्ड सादर करणे अनिवार्य आहे. मात्र निधी काढण्यासाठी आधार कार्डाची आवश्यकता नसल्याचे कर्मचारी निवृत्ती वेतन निधी संघटना अर्थात इपीएफओने स्पष्ट केले आहे.
निवृत्ती वेतन हक्काचे अंतिम व्यवहार करण्यासाठी आधारची गरज नसल्याची बातमी काही वृत्तपत्रांत आली आहे. 1995 च्या कर्मचारी निवृत्ती वेतन योजनेतून निधी काढण्यासाठी आधार सादर करणे अनिवार्य नसल्याचे ईपीएफओने खुलासा देताना स्पष्ट केले आहे. मात्र निवृत्ती वेतनाबाबत अंतिम व्यवहार पूर्ण करण्यासाठी तसेच योजना प्रमाणपत्र प्रकरणात मात्र आधार अनिवार्य आहे.
दरम्यान, 1995 च्या कर्मचारी निवृत्ती वेतन योजनेतील सदस्यांनी आधार क्रमांक अधिप्रमाणित करुन घेण्यासाठी सादर करण्याची मुदत इपीएफओने 31 मार्च 2017 पर्यंत वाढवली आहे.