ठाणे 2 मार्च 2017/AV News Bureau:
ठाणे महापालिकेला स्टेमकडून होणारा पाणी पुरवठा 3 मार्च रोजी सकाळी 9 ते 4 मार्च सकाळी 9 वाजेपर्यंत बंद राहणार आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रातील समतानगर, ऋतुपार्क, सिध्देश्वर, जेल, साकेत, उथळसर, रेतीबंदर, मुंब्रा-कोळीवाडा,शैलेशनगर, संजयनगर, शैलेश नगर ,संजय नगर, कळव्याचा काही भाग ,गावदेवी परिसर , रॅम मारुती रोड एका बाजूस , नाईक वाडी , दादा पाटील वाडी , बी -केबिन चेंदणी कोळीवाडा ,नागसेन नगर ,महागिरी ,खारकर अली , कोर्ट नाका व मासुंदा तलाव परिसर,घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कंपाऊंड,आझादनगर, डोंगरीपाडा, वाघबीळ या परिसराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
या शटडाऊनमुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असून, नागरिकांनी पालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.