नागोठणे-रोहा रेल्वे मार्गावर 3 मार्चला ट्रॅफिक ब्लॉक

नवी मुंबई, 2 मार्च 2017/AV News Bureau:

रेल्वे मार्गावरील कामासाठी उद्या नागोठणे ते रोहा रेल्वे स्थानकांदरम्यान चार तासांचा ट्रॅफिक ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. सकाळी 11.50 ते सायंकाळी 3.50 या काळात  यामार्गावर वाहतूक बंद ठेवण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेने जाहीर केले आहे. यामुळे अनेक गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केले आहेत.

डाउन गाड्या

  1. गाडी क्रमांक 71089 दिवा-रोहा गाडी ही नागोठणेपर्यंतच चालविण्यात येणार आहे. ही गाडी नागोठणे आणि रोहा दरम्यान रद्द करण्यात आली आहे.
  2. गाडी क्रमांक 19262 पोरबंदर-कोचुवेली एक्सप्रेस ही गाडी कासू रेल्वे स्थानकात 2 तास 30 मिनिटांसाठी थांबवण्यात येईल.
  3. गाडी क्रमांक 16345 एलटीटीई- थिरुवनंतपुरम सेंट्रल नेत्रावती एक्सप्रेस पेण स्थानकात 2 तास थांबण्यात येईल.

अप गाड्या

  1. गाडी क्रमांक 16346 थिरुवनंतपुरम सेंट्रल- एलटीटीई नेत्रावती एक्सप्रेस गाडी 2 तास रोहा स्थानकात थांबवण्यात येईल.
  2. गाडी क्रमांक 71096 रोहा – दिवा डीएमयु गाडी नागोठणे येथून धावेल (सायंकाळी 4 वाजता सुटेल). ही गाडी रोहा-नागोठणे दरम्यान रद्द करण्यात आली आहे.