नवी मुंबई, 1 मार्च 2017/AV News Bureau:
होळीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक चांगली बातमी आहे. मध्य रेल्वेने होळीसाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेवून कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
सीएसटी -करमाळी-सीएसटी
- गाडी क्रमांक 01033 मुंबई सीएसटी-करमाळी विशेष गाडी 10 मार्चला (शुक्रवारी) रात्री 11.55 ला सीएसटी स्थानकातून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता करमाळी स्थानकात पोहोचेल.
- गाडी क्रमांक 01034 करमाळी-सीएसटी ही विशेष गाडी 11 मार्चला (शनिवारी) दुपारी 1.35 ला करमाळी रेल्वे स्थानकातून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री 12.10 ला पोहोचेल.
- गाडीचे थांबे
या गाड्यांना दादर, ठाणे, पनवेल, रोहा,माणगाव, खेड, चिपळुण, रत्नागिरी, राजापुर रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिविम रेल्वे स्थानकांमध्ये थांबा देण्यात आला आहे.
- डब्यांची रचना
या गाड्यांना 16 डबे जोडण्यात येणार आहेत. यामध्ये 1 एसी 2 टायर, 2 एसी 3 टायर, 4 स्लीपर, 7 जनरल आणि 2 एसएलआर डब्यांचा समावेश असेल.
सीएसटी- मडगाव-सीएसटी
- गाडी क्रमांक01089 मुंबई सीएसटी-मडगाव ही विशेष गाडी 12 मार्च रोजी रात्री 11.55 ला सीएसटीहून सुटेल आणि दुसऱ्य दिवशी दुपारी 12 वाजता मडगाव स्थानकात पोहोचेल.
- गाडी क्रमांक 01090 मडगाव-सीएसटी ही विशेष गाडी 13 मार्च रोजी सायंकाळी 7.40 ला मडगावहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 8.15 ला सीएसटी स्थानकात पोहोचेल.
- गाडीचे थांबे
या गाड्यांना दादर, ठाणे, पनवेल, रोहा,माणगाव, खेड, चिपळुण, रत्नागिरी, राजापुर रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिविम रेल्वे स्थानकांमध्ये थांबा देण्यात आला आहे.
- डब्यांची रचना
या गाड्यांना 16 डबे जोडण्यात येणार आहेत. यामध्ये 1 एसी 2 टायर, 2 एसी 3 टायर4 स्लीपर, 7 जनरल आणि 2 एसएलआर डब्यांचा समावेश असेल.