मुंबई, 1 मार्च 2017/AV News Bureau:
केरळमध्ये कम्युनिस्ट पक्षांच्या व डाव्या आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपच्या कार्यकर्त्यांवर हल्ले केले जात असल्याचा आरोप करीत या हिंसाचाराच्या विरोधात आज आझाद मैदान येथे भाजपचे कार्यकर्ते निदर्शने करणार आहेत, अशी माहिती प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी दिली.
या परिस्थितीबद्दल जनतेमध्ये जागृती करण्यासाठी देशभरातील 150 शहरांत १ मार्च रोजी विरोध प्रदर्शन करण्यात येणार आहे. या निदर्शनांमध्ये सक्रीय सहभागी होण्याची सूचना राज्यातील भाजपा कार्यकर्त्यांना देण्यात आली आहे.
मुंबईत ‘फोरम अगेन्स्ट कम्युनिस्ट टेररिझम’– फॅक्टतर्फे आझाद मैदान येथे दुपारी ३ ते ५ या वेळात निदर्शने करण्यात येतील व त्यानंतर राज्यपालांना निवेदन सादर करण्यात येईल,असेही भंडारी यांनी म्हटले आहे.