बेकायदेशीर प्रवासी वाहतुकीचे जाळे फोफावतेय 

highway traffic

 स्वप्ना हरळकर/AV News :

नवी मुंबई, 28 फेब्रुवारी 2017:

झपाट्याने विकसित होणाऱ्या नवी मुंबई शहरात गेल्या दोन वर्षांत बेकायदेशीर प्रवासी वाहतुकीचा आलेख उचांवत चालला आहे. सन 2016 मध्ये बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करणाऱ्या 1673 जणांवर नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. यापैकी 1236 प्रकरणांमध्ये न्यायालयाने बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करून 26 लाख 57 हजार 300 रुपयांचा दंड ठोठावला आहे. वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्यामुळे नवी मुंबईत बेकायदेशीर प्रवासी वाहतुकीचे प्रमाण वाढत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

नवी मुंबई हे झपाट्याने विकसित होणारे शहर म्हणतात. मात्र या शहराची वाहतूक व्यवस्था अद्याप विकसित झालेली नाही. शहराच्या अंतर्गत भागात नागरिकांना वाहतुकीसाठी सार्वजनिक उपक्रम सेवा म्हणून नवी मुंबई परिवहन उपलब्ध आहे. मात्र गाड्यांची दुरवस्था, विलंबाने धावणाऱ्या गाड्या यामुळे  कामधंद्यानिमित्त धावपळ करणारे नागरिक नाईलाजाने रिक्षाकडे वळतात. मग इच्छित ठिकाणी वेळेत पोहोचायचे असेल तर रिक्षाचालक सांगेल तेवढे पैसे देणे नागरिकांना भाग पडते. शेअर रिक्षाच्या नावाखाली बहुसंख्य ठिकाणी मीटरचा वापरच बंद करण्यात आला आहे. त्यामुळे अनेकदा रिक्षाचालक चार ते पाच प्रवासी गाडीत घेतात.अशावेळी काही दुर्घटना झाली तर त्याला जबाबदार कोण, असा सवाल नागरिक विचारू लागले आहेत.

road karvaee

ठळक मुद्दे

  • 2014-15 च्या तुलनेत 2015-16 मध्ये अवैध प्रवासी वाहतुकीमध्ये 5.2 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
  • 2015 मध्ये एकूण 1593 बेकायेदशीर वाहतुकीची प्रकरणे घडली. यामध्ये 943 प्रकरणे न्यायालयात गेली असता 18 लाख 56 हजार 300 रुपयांचा दंड आकारण्यात आला होता.
  • 2016 मध्ये 1673 बेकायदेशीर वाहतुकीची प्रकरणे उघडकीस आली. त्यामध्ये1236 प्रकरणांवर न्यायालयात सुनावणी होवून 26 लाख 57 हजार 300 रुपांचा दंड वसूल करण्यात आला.

dcp pravin pawar byte

 

 

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत बेकायदेशीर वाहतूक रोखण्यासाठी नवी मुंबई पोलीस सातत्याने अशा वाहनांवर कारवाई करीत अाहेत. यापुढेही बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच त्यांचा वाहन परवाना कायमस्वरुपी रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल.

 नितीन पवार –उपायुक्त, वाहतूक शाखा नवी मुंबई