वंडर्स पार्कमध्ये3 ते 5 मार्चदरम्यान फुले, फळे प्रदर्शन

flower

नवी मुंबई, 28 फेब्रुवारी 2017/AV News Bureau:

नवी मुंबई महानगरपालिका वृक्ष प्राधिकरणाच्या वतीने नेरुळच्या वडर्स पार्क येथे 3 ते 5 मार्च या काळात झाडे, फुले, फळे, भाजीपाला यांचे प्रदर्शन आणि स्पर्धेचे  आयोजन करण्यात आले आहे.

या प्रदर्शनात निसर्गाने मुक्तहस्ताने निर्मिलेली झाडे, फुले, फळे, भाजीपाला यामधील आकर्षक विविधता एकाच छताखाली अनुभवता येणार आहे. या प्रदर्शनात नामवंत उद्योगसमुह, शैक्षणिक संस्था, विद्यालये, महाविद्यालये, गृहनिर्माण संस्था,  पर्यावरणप्रेमी नागरिक सहभागी होणार आहेत. या ठिकाणी फुलांची रांगोळी, फळे, फुले, भाज्या यांच्या कलात्मक रचना, बोन्साय, उद्यान रचना असे निसर्ग वैभव व वैविध्य अनुभवता येणार असून उद्यानाशी संबंधित विविध साहित्य, विविध वृक्ष रोपे, वेली, पूरक खते आदी बाबींचे स्टॉलही उपलब्ध असणार आहेत.

सहभागासाठी संपर्क

  • या प्रदर्शनात अथवा स्पर्धेत सहभागी होण्याकरीता अधिक माहितासाठी नागरिकांनी सहा. उद्यान अधिकारी यांच्याशी 022- 27566063 किंवा022- 27567064 या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रदर्शनाची वेळ

  • 3 मार्च रोजी दुपारी12 ते रात्रौ 9 वाजेपर्यंत तसेच
  • 4 व5 मार्च रोजी सकाळी30 ते रात्रौ 9 पर्यंत
  • हे प्रदर्शन नागरिकांसाठी विनामूल्य खुले