मध्य रेल्वेचा नागोठणे-रोहा मेगाब्लॉक

चार तास वाहतूक बंद

नवी मुंबई, 2८ फेब्रुवारी 2017/AV News Bureau:

भुयारी मार्गाच्या कामासाठी आज नागोठणे ते रोहा दरम्यान चार तासांचा मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. दुपारी 12.30 ते सायंकाळी 4.35 या काळात  यामार्गावर वाहतूक बंद ठेवण्यात आल्याचे मध्य रेल्वेने जाहीर केले आहे. यामुळे अनेक गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केले आहेत.

डाउन गाड्या

  1. गाडी क्रमांक 71089 दिवा-रोहा गाडी ही नागोठणेपर्यंतच चालविण्यात येणार आहे. ही गाडी नागोठणे आणि रोहा दरम्यान रद्द करण्यात आली आहे.
  2. गाडी क्रमांक 16345 डेहराडून-कोचुवेली एक्सप्रेस ही गाडी कासू रेल्वे स्थानकात 2 तास 40 मिनिटांसाठी थांबवण्यात येईल.
  3. गाडी क्रमांक 16345 एलटीटीई- थिरुवनंतपुरम सेंट्रल नेत्रावती एक्सप्रेस पेण स्थानकात 2 तास 38 मिनिटांसाठी थांबण्यात येईल.

 

अप गाड्या

  1. गाडी क्रमांक 16346 थिरुवनंतपुरम सेंट्रल- एलटीटीई नेत्रावती एक्सप्रेस गाडी 3 तास 5 मिनिटे रोहा स्थानकात थांबवण्यात येईल.
  2. गाडी क्रमांक 71096 रोहा – दिवा गाडी नागोठणे येथून धावेल. ही गाडी रोहा-नागोठणे दरम्यान रद्द करण्यात आली आहे.